कार्यक्रम आणि उपक्रम

  • क्रिडा दिन
    वय हे बंधन नाही. “क्रिडा दिन” हा प्रत्येक वयोगटातील महिलांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो. सर्व विद्यार्थी पूर्ण उत्साहाने यात सहभागी होतात.
  • नेल आर्ट वर्कशॉप
    नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेल आर्ट वर्कशॉप आयोजित केला जातो. नखांवर वेगवेगळी कलाकुसर केली जाते.
  • बॅग मेकिंग वर्कशॉप
    छोट्या पर्स पासून मोठ्या बॅग पर्यंत विविध प्रकारच्या कापडी बॅग शिवण्याचे वर्कशॉप घेतले जाते. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी होतात.
  • फॅशन शो
    प्रशिक्षनार्थिंनी शिवलेल्या वेगवेगळ्या ड्रेस पॅटर्न चा फॅशन शो आयोजित केला जातो. यामध्ये ट्रॅडिशनल , वेस्टर्न व इन्डोवेस्टर्न या सर्व प्रकारच्या ड्रेस चे पॅटर्न असतात. स्वतः शिवलेला ड्रेस परिधान करून मुली शो मध्ये सहभागी होतात.
  • गणपती डेकोरेशन
    गणपतीसाठी डेकोरेशन, रांगोळी या विविध कलांची कार्यशाळा घेतली जाते.
  • आर्टिफिशिअल फ्लॉवर्स
    संस्थेतील मुलींसाठी व इतर महिला- मुलींसाठी फुलांचे विविध कोर्स ची कार्यशाळा घेतली जाते.
  • पपेट वर्कशॉप
    वेगवेगळ्या प्रकारचे पपेट शिकविले जाते. जसे की सॉक्स पपेट, पेपर पपेट, फरपपेट, स्टीकपपेट इ.
  • मेहंदी वर्कशॉप
    नागपंचमी, राखीपौर्णिमा या सणांना शाळेतील ९ – १० वी च्या मुलींच्या हातावर मेहंदी काढण्याचा उपक्रम असतो.
  • कला कौशल्य कार्यशाळा
    पणती डेकोरेशन विविध प्रकारच्या पणत्या डेकोरेटिव्ह कशा करायच्या, याची दरवर्षी कार्यशाळा घेण्यात येते. रांगोळीचे विविध १० प्रकारांची कार्यशाळा घेण्यात येते.
  • संस्थेचा वर्धापन दिन
    आबासाहेब गरवारे महाविध्यालायाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात नेल आर्ट, आर्टिफिशिअल बुके , कलाकुसरीच्या वस्तू व बॅग व ड्रेसचे पॅटर्न यांचा स्टॉल लावण्यात आला.
  • योग दिन
    २१ जून जागतिक योग दिनाच्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी होतात व योगासनाचे प्रात्यक्षिक करतात.
  • कौशल्यसेतू
    रेणुका स्वरूप प्रशालेतील ९ वी व १० वी च्या विध्यार्थिनी कौशल्य विकसित करण्यासाठी कौशल्यसेतू हा उपक्रम घेतला जातो.
  • भोंडला
    नवरात्रात भोंडल्याचे आयोजन केले जाते. सगळ्या प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी होतात.
  • श्रावणसरी
    श्रावण महिन्यात श्रावणसरी हा कार्यक्रम घेतला जातो. यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते महिलांच्या विविध कलागुणांना स्पर्धांमुळे वाव मिळतो. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक दिले जाते.
  • स्नेहसंमेलन
    दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यामुळे मुलींना आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. यामुळे मुली खूप उल्हासित होतात.

Govt Courses 2024


This will close in 20 seconds